महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशनच्या(सीटू)वतीने कामगारांच्या मागण्या साठी राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे साहेब यांच्या विजयनगर येथील असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच्या ऑफिसवर इमारत व इतर बांधकाम कामगारांनी भव्य मोर्चा काढला होता.या मोर्चाचे नियोजन सीटूचे राज्याचे अध्यक्ष मा.प्रा.बी जी खाडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व सरचिटणीस कॉम्रेड जालिंदर गिरी, कॉ.ओम पुरी,कोषाध्यक्ष सुवर्णा रेवले,उपाध्यक्ष मा.संजय जाधव, कॉम्रेड उमेश देशमुख व श्रमजीवी कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष माननीय संतोष पाटील यांच्या नियोजनाखाली व राज्यातील असंख्य पदाधिकारी व इमारत व इतर बांधकाम कामगार यांनी एकत्र येऊन सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असणाऱ्या कामगार मंत्र्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चाचं आयोजन केलं होतं. यामध्ये बांधकाम कामगार व इतर कामगारांना दिवाळीसाठी वीस हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, 2019 प्रमाणे साहित्य खरेदी योजना सुरू करा व साहित्य साठी दहा हजार रुपये द्यावे,साठ वर्षावरील नोंदीत कामगारांस दहा हजार रुपये प्रति महिना पेन्शन चालू करावी, सुरक्षा संच,भांडी संच देण्याऐवजी त्यांची असणारी किंमत कामगारांच्या खात्यावर जमा करा, सर्व जिल्ह्यात मेडिक्लेम योजना चालू करा,त्यात त्यांच्या आई-वडिलांचे नाव समाविष्ट करा, राज्यातील प्रत्येक तालुक्यात कामगारांसाठी एक दवाखाना करा, घर बांधण्यासाठी साडेचार लाख रुपये मंजूर करा, बोगस कामगार नोंदणी रद्द करा,मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांची नोंद करून त्यांना त्यांचे लाभ द्या,या अशा विविध अनेक मागण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असणाऱ्या पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता या मोर्चाचे स्वरूप सभेत झाले.या ठिकाणी दिवसभर ठिय्या आंदोलन केले,आलेल्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री यांची भेट घेऊन निवेदन दिले पालकमंत्र्यांनी निवेदन स्वीकारून भविष्यात मागण्या मान्य करू असे आश्वासित केले. या वेळेलाश्रमजीवी कामगार संघटनेचे राज्यअध्यक्ष माननीय संतोष पाटील म्हणाले की येत्या काही दिवसात राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास येत्या दिवाळीत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व कामगार मंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे यांच्या शंभर फुटी रोड, सांगली या निवासस्थानाच्या समोर दिवाळीत शिमगा साजरा करणार असं वक्तव्य केले. या वेळेला अनेक जिल्ह्यातूनआलेले शेकडो बांधकाम कामगार महिला व पुरुष उपस्थित होते. या वेळेला गजू पटेल,जावेद शेख,प्रकाश वाघमारे, कृष्णा कांबळे,अर्जुन सोळंके,नितीन भैरट ,ज्ञानेश्वर आजबे,गणेश चौधरी ,विश्वनाथ यादव ,ज्ञानेश्वर शेळके,साबिर शेख, हनुमंत मोरे,मुस्तफा शेख,विनोद गंडले,संजय कसबे व इतर अनेक पदाधिकारी व हजारो कामगार बांधव महिला पुरुष उपस्थित होते. यावेळी सर्वांनी कामगार मंत्र्यांच्या विरोधात घोषणा दिल्या निषेध व्यक्त केला.
Tags
सांगली प्रतिनिधी