सांगली :
महानगरपालिका आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख, सामाजिक व हातगाडीवाले संघटना यांची संयुक्त बैठक घेऊन भाजीपाला विक्रेत्यांच्या समस्या तसेच वाहतूक कोंडीबाबत दीर्घकालीन उपाययोजना आखण्यात येतील, असे आश्वासन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी दिले. भाजीपाला विक्रेते व हातगाडीवाल्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सदैव पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
महापालिकेच्या फेरीवाला समितीवर जनसेवा भाजीपाला संघटनेचे वर्चस्व सिध्द झाले. जनसेवा भाजीपाला संघटना नेते शंभुराज काटकर यांचे व विजयी झालेल्या कैश अहमद मुनीर अलगुर, बेबी दावल शेख, महेश मोतुगडे, लता दुधाळ, सादिक बागवान यांचा सत्कार जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भाजी विक्रेत्यांच्या समस्या, वाहतूक कोंडीबाबत चर्चा झाली. मदन पाटील यांनी तळागाळातील मोलमजुरी करून जगणार्या छोट्या खोकीधारकांचे पुनर्वसन केले होते. हेच काम पुढे नेत असल्याबध्दल सार्यांनी जयश्री पाटील यांना धन्यवाद दिले. अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Tags
सांगली प्रतिनिधी