इस्लामपूर : प्रतिनिधी
गोटखिंडी (वाळवा) भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या विशेष प्रयत्नातून मिळालेल्या ७२ लाख रुपये निधीतून होणाऱ्या पाणंद रस्त्यांच्या कामांना शुक्रवारी प्रत्यक्ष प्रारंभ झाला.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष निवास पाटील म्हणाले, महायुती सरकारच्या माध्यमातून निशिकांतदादांनी इस्लामपूर मतदार संघातील पाणंद रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे. आज गोटखिंडी येथील नागनाथ शेजावळे शेत ते भीमराव साळुंखे शेत, रंगराव माळी शेत ते सचिन पाटील शेत, शहाजी पाटील शेत ते सुभाष घारे शेत, भीमराव मोरे शेत ते विष्णू महाजन शेत या पाणंद रस्त्यांच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. यामुळे आता अनेक वर्षे शेतकऱ्यांना खते, धाने, आदींची वाहतूक करताना होणारी तारेवरची कसरत थांबणार आहे. यापुढे ही आम्ही निशिकांतदादाच्या मार्गदर्शनाखाली गोटखिंडी गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहू.
यावेळी हुतात्मा दूध संघाचे उपाध्यक्ष भगवान पाटील, दीपक शिंगटे, अरविंद पाटील, अशोक पाटील, महादेव घारे, प्रकाश पाटील, अतिष जाधव, राहुल भुईटे, ज्ञानदेव साळुंखे, प्रकाश शिंगटे, अशोक पाटील, बाबासो कुलकर्णी, नागनाथ थोरात यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोटखिंडी : येथे पाणंद रस्त्यांच्या कामांना शुक्रवारी प्रत्यक्ष सुरुवात झाली. यावेळी उपस्थित निवास पाटील, भगवान पाटील आदी.
Tags
इस्लामपूर प्रतिनिधी