पडवळवाडी, अहिरवाडी, गाताडवाडी, तुजारपूर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ
इस्लामपूर : प्रतिनिधी
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावात विद्यमान आमदारांकडून कोट्यवधी रुपये निधी आल्याचे बोर्ड लावण्यात आले.तो निधी कोणी दिला आहे हे कोणी सांगायची आवश्यकता नाही, परंतु या ३५ वर्षात मतदार संघात तो विकास कुठे दिसून आला नाही. मतदार संघातील खड्डेमय रस्ते, पाणंद रस्त्यांची झालेली दैना, यासह मूलभूत प्रश्न जैसे थे आहेत. त्यामुळे विकासाच्या नावाखाली दिशाभूल करण्याचा तुमचा कार्यक्रम घेणाऱ्या आमदारांचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम तुम्ही घ्या, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी केले.
पडवळवाडी येथे ३६ लाख, अहिरवाडी येथे १८ लाख, गाताडवाडी येथे २७ लाख, तुजारपूर येथे ७० लाख ९७ हजार रुपये निधीतून विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. भाजपा इस्लामपूर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, तालुकाध्यक्ष निवास पाटील, महिला आघाडी अध्यक्षा सुरेखाताई जगताप, संघटन सरचिटणीस संदीप सावंत, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मधुकर हुबाले, प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, येथील विद्यमान आमदारांच्या हाती गेले ३५ वर्षे तुम्ही एकहाती सत्ता दिली आहे. परंतु त्यांनी मतदार संघाचा विकास सोडून घराघरात, भाव-भावकित, समाज-समाजात दरी निर्माण करण्याचे काम केले. शेतकर्यांच्या ऊसाला योग्य मोबादला देण्यासाठी या नेतृत्वाने कधी ही पुढाकार घेतला नाही. गावागावाती रस्ते, गटर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,पाणंद रस्ते, दिवाबत्ती यांची आज ही काय आवस्था आहे, हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. ३५ वर्षाचे दिवस काढले तर १२ हजार ७७५ होतात. परंतु त्यांनी मनात आणले असते तर मतदार संघात आतापर्यंत एकही प्रश्न शिल्लक राहिला नसता. कोणतेही निवेदन देण्याची वेळ तुमच्यावर आली नसती. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या बिन कामाच्या लोकप्रतिनिधींना त्यांची योग्य जागा दाखवून द्या.येणारी पाच वर्षे मला द्या विकासाबरोबर तुमच्या प्रशासस्तरावरील प्रलंबीत कामांना योग्य न्याय देण्यासाठी मी कटिबध्द राहीन.
यावेळी पडवळवाडी येथे अभिजीत खोत, भगवान किरोलकर, भगवानराव रकटे-खोत, अमोल बाड, शंकरराव सुर्वे, हुतात्मा बझारचे संचालक अशोक खोत, शिवाजीराव खोत, शामराव सुर्वे, मारुती यादव, कृष्णात सपकाळ, अक्षय कोकाटे, अभिजीत पाटील, विक्रम शिंदे, सचिन सावंत तर अहिरवाडी येथे सरपंच बाळासो यादव, दीपक यादव, माजी सरपंच अरुण यादव, शिवदास यादव, युवराज खामकर, शुभम पवार, शिवाजी खामकर, प्रकाश यादव, प्रवीण यादव, गुणवंत यादव, अनिकेत पाटील, पांडुरंग यादव, अनिल यादव, सूरज पवार, हणमंत पवार, मनजीत यादव, सौरभ यादव व गाताडवाडी येथे मानद संचालक सर्जेराव जाधव, हणमंतराव खोत, मनोज खोत, निलीमाताई खोत, गजानन खैरमोडे, शंकर चौगुले, कुंडलिक खोत, संजय जाधव, हनुमंत नांगरे, राहुल खोत, अनिकेत खोत, उत्तम जाधव, तन्मय खोत, विशाल जाधव तसेच तुजारपूर येथे सरपंच तुकाराम सुतार, नीलेश बाबर, माजी सरपंच बाळकृष्ण बाबर, कृष्णात सासणे, ऐश्वर्याताई बाबर, शितलताई वायदंडे, उत्तमराव पाटील, नारायण निकम, माणिक पाटील, शंकरराव बाबर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
इस्लामपूर प्रतिनिधी