उच्चशिक्षितांना शंभर टक्के रोजगार देणार :डॉ शंकरदादा माने





उच्चशिक्षितांना शंभर टक्के रोजगार देणार: डॉ.शंकरदादा माने

बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून उच्चशिक्षित युवकांना निवडून आल्यानंतर काम देण्याची हमी शंभर टक्के,आजपर्यंतच्या प्रस्थापित आमदार,खासदारांनी  तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील चालू असलेले कारखाने एक तरी विकले,एक तरी बंद केले,३५ वर्ष सत्तेत असून मतदार संघातील उच्चशिक्षित युवक बेरोजगार राहिले आहेत.ही परिस्थिती बदलण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे हत्ती या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा.असे आवाहन डॉ.शंकरदादा माने यांनी मतदारांना केले.

नागज(ता.कवठेमहांकाळ)येथील सभेमध्ये  डॉ.शंकर माने म्हणाले बहुजन समाज पार्टी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर,छ.शिवाजी महाराज,शाहू,फुले च्या विचारधारेवर चालणारी आहे.ना कोणती जात ना कोणता धर्म,माणुसकीचे काम करणारी पार्टी आहे . ३५ वर्ष डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली आहे


,आता मतदारांनी डोळे जागरूक राहण्याची गरज आहे. प्रस्थापितांची सत्ता बदलण्याची अत्यंत आवश्यकता आहे.सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम करण्यास बहुजन पार्टी कटीबद्ध आहे.बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ.शंकरदादा माने हे शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर कोर्टाचे नोटरी करून शंभर टक्के सर्वांगीण विकास कामाची हमी देत आहेत.त्यासाठी फक्त एक वेळ डॉ.शंकर माने यांना संधी देऊन बहुजन समाज पार्टीच्या हत्ती या चीन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिकाने विजयी करावे.असे आवाहन या सभेत डॉ.शंकर माने यांनी केले.यावेळी बहुजन समाज पार्टीच्या महिला जिल्हाप्रमुख राखी शिंदे, प्रदेश अध्यक्ष शहाजी भाऊ केंगार, कवठेमंहाकाळ तालुका ध्यक्ष संतोष वानखडे. गौरव लोंढे. युवा तालुकाध्यक्ष शुभम चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ,मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post