प्रभाग क्रमांक १२ च्या राजकारणाला नवे वळण विमलताई व विशाल हिप्परकर यांचा भाजपमध्ये प्रवेश


सांगली, दि. ५ — सांगली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ मधील माजी नगरसेविका विमलताई हिप्परकर तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष विशाल हिप्परकर यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक १२ मधील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.
भारतीय जनता पक्षाचे महापालिका निवडणूक प्रमुख शेखर इनामदार यांच्या उपस्थितीत हिप्परकर यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शेखर इनामदार यांनी दोघांचे भाजपमध्ये स्वागत करत सत्कार केला.
पक्षप्रवेशानंतर बोलताना विमलताई व विशाल हिप्परकर यांनी प्रभाग क्रमांक १२ मधील भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग राहील, असे जाहीर केले.
यावेळी भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी, पैलवान दिलीपराव सूर्यवंशी, अशोक सूर्यवंशी, पांडुरंग हिप्परकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व लोणारी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post