स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय ? निवड कशी केली जाते ?


सध्या महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण जोरदार सुरू असताना काही अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यासाठी नेते मंडळींनी स्वीकृत नगरसेवक पद देऊ असा शब्द दिला आहे अशी चर्चा चालू आहे.

 नेमके स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय असते त्याबद्दलच थोडक्यात माहिती घेऊ 

स्वीकृत नगरसेवक हा महानगरपालिका किंवा नगरपरिषद यातील सर्वसाधारण सभेतील सदस्य असतो जो लोकांच्यातून निवडून दिला जात नाही. 

स्वीकृत नगरसेवकाची नियुक्ती ही महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या शिफारसीनुसार आणि पालिकेच्या सभागृहाच्या संमतीने होते.

प्रत्येक पक्षाच्या एकूण नगरसेवक संख्येच्या 10 टक्के पर्यंत सदस्य निवडता येतात.

स्वीकृत नगरसेवकांना चर्चेमध्ये सहभागी होता येते . परंतु त्यांना मतदानाचा अधिकार नसतो.

Post a Comment

Previous Post Next Post