मिरज विधानसभा मतदार संघामध्ये गेली पंधरा वर्षे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करताना मिरज शहर व ग्रामीण भागातील जनतेशी माझे व माझ्या कुटुंबियांचे एक कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे, अशा भावना महायुतीचे उमेदवार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी नागरिकांशी बोलताना व्यक्त केल्या. समाज सेवेच्या निमित्ताने मी व माझे कुटुंबिय मिरज मतदार संघामध्ये अविरत काम करीत असतो. यावेळी या मतदार संघातील जनतेनेही आम्हां खाडे कुटुंबियांवर जो विश्वास व प्रेम दाखविले आहे. त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. आम्ही नेहमी आपल्या सर्वांचे ऋणी राहु.
गेल्या पंधरा वर्षामध्ये विकास कामांच्या माध्यमातून मी आपली सेवा करीत आलो आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने मला राज्याच्या मंत्रीमंडळात दोन वेळा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. एक वेळ समाजकल्याण मंत्री म्हणून तर कामगार मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे सांगली जिल्ह्याचा व मिरज विधानसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी मला या पदांची ताकद मिळाली. सांगली जिल्ह्यात व मिरज विभागात आरोग्य, रस्ते, शेतीसाठी विज व पाणी पुरवठा करण्यासाठी मला यश मिळाले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पशुसेवा, समाज कल्याण विभाग, महिला व बाल विकास, जलसंपदा विभागातील कामे तत्परतेने पुर्ण करता आली. हे सगळं आपल्या सर्वांच्या सहकार्याने व आशिर्वादाने शक्य झाले आहे. यापुढेही मिरज विधानसभा मतदार संघाचा सर्वांगिण विकास करण्यास कटीबध्द असणार आहे. मतदार संघात निधी कमी पडु देणार नाही, अशी ग्वाही भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी नागरिकांशी संवाद साधताना दिली. मोठ्या संख्येंने गावातील मतदान करून घ्यावे अशी विनंती केली. व आपली सेवा करण्याची मला पुन्हा एकदा संधी देण्यासाठी ‘कमळ’ चिन्हासमोरील बटण दाबुन आपले बहुमुल्य मत द्यावे. प्रचार दौऱ्यावेळी उपस्थित राहुन मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. राज्यात परत एकदा भाजपा महायुतीचे सरकार आणून विकासाला चालना देवुया
Tags
मिरज प्रतिनिधी