सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक २०२६ पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक.१४ मधील अधिकृत उमेदवार श्री.विजय साळुंखे, श्री.उदय बेलवलकर, सौ.मनीषाताई कुकडे, सौ.अनिताताई पवार या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ आणि प्रभागातील पक्ष कार्यालयाचा उद्घाटन समारंभ सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाला.
या शुभारंभासोबतच महानगरपालिका निवडणूक प्रचारालाही अधिकृत सुरुवात झाली असून, जनतेच्या विश्वासावर आधारित, विकासाच्या मुद्द्यांवर केंद्रित आणि सकारात्मक प्रचार करण्याचा निर्धार सर्व उमेदवारांनी करून महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलवण्याचा संकल्प केला.
यावेळी परमपूज्य गुरुनाथ कोटणीस महाराज, परमपूज्य दीपक नाना केळकर महाराज, भाजपा परिषद सदस्य प्रकाश तात्या बिरजे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, भाजपा किसान प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजपा जैन प्रकोष्ट प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, आदी गावभाग मधील सर्व माझे ज्येष्ठ सहकारी, मंडलाध्यक्ष, भाजपा पदाधिकारी आणि प्रभागातील सर्व बंधू व माता-भागिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
प्रभाग 14