नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम चे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन.

कुपवाड प्रतिनिधी सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मार्फत दिनांक सात ते दहा नोव्हेंबर 2024 या कालावधीत वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सदर स्पर्धेचे उद्घाटन सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सहाय्यक क्रीडा अधिकारी श्री पारस पाटील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त यांच्या हस्ते संपन्न झाले. नव कृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनिअर कॉलेज मार्फत या वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये मैदानी स्पर्धा कॅरम चेस स्विमिंग बास्केटबॉल खो-खो कबड्डी रस्सीखेच फुटबॉल व्हॉलीबॉल अशा विविध खेळाच्या स्पर्धा संपन्न होणार आहेत यासाठी पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी असे चार ग्रुप करण्यात आले आहेत. या स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पारस पाटील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त यांनी विद्यार्थ्यांनी सातत्याने खेळावे खेळाकडे करिअर म्हणून निवडावे राज्य व केंद्र शासनामार्फत खेळासाठी भरपूर योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा असे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितले. उद्घाटन प्रसंगी श्री प्रशांत चव्हाण उप प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल यांनी स्वागत व प्रस्तावित केले. स्पोर्ट्स इन चार्ज श्री विनायक जोशी यांनी आभार व्यक्त केले यावेळी संस्थेच्या संचालिका व प्राचार्य सौ संगीता पागनीस उपस्थित होत्या. स्पर्धेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण जी लुंकड व सचिव एन जी कामत यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post