महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये लक्ष्मण नवलाई ,मालन गडदे ,गीतांजली ढोपे पाटील व प्रशांत पाटील हे चारही उमेदवार निश्चितपणे निवडून येतील आणि भाजपचाच महापौर होईल आणि या वार्डाचा सर्वांगीण विकास साधला जाईल असा विश्वास आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक 17 च्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रविवारी सायंकाळी पार पडले यावेळेस आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे ,भाजप नेते पृथ्वीराज पाटील ,रावसाहेब पाटील ,सिद्धार्थ गाडगीळ ,प्रभाग निवडणूक प्रभारी सुनील मानकापूरे ,राजेश साबणे, प्रशांत सावर्डेकर, अरुण बाबर , कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आमदार गाडगीळ म्हणाले प्रभाग क्षेत्रामध्ये भाजपचे वातावरण चांगले आहे महानगरपालिकेच्या 2018 च्या निवडणुकीत या प्रभागात भाजपला मोठे यश मिळाले लक्ष्मण नवलाई गीता सुतार गीतांजली डोपे पाटील यांनी या प्रभागामध्ये अनेक विकास कामे केली या प्रभागात पुन्हा भाजपचा माहोल तयार झाला आहे त्यामुळे नागरिकांनी भाजपला पुन्हा मोठ्या मत धिक्याने निवडून द्यावे .
शेखर इनामदार म्हणाले हा भाग शहराच्या मध्यवर्ती असल्यामुळे पाच वर्षात चांगली विकास कामे झालेली आहेत. यावेळी ही या प्रभागातून भाजपचे चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला