संजयकाकांच्या प्रचारासाठी महिला मोर्चा आघाडीवर

सांगली, दि.: सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या निवडणूक प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने जोरदार प्रचार मोहीम राबवली आहे. ठिकठिकाणी महिलांच्या बैठका सभा होत आहेत. महिलांची संवाद सुरू आहे.
महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या छोट्या मोठ्या बैठका होत आहेत. संजयनगर, अभयनगर ,विश्रामबाग वगैरे परिसरात अशा अनेक बैठका झाल्या आहेत. 
या बैठकांमध्ये केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य महिलांसाठी राबवलेल्या योजना, तिहेरी तलाक रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, गोरगरिबांना मोफत धान्य वाटप योजना अशी माहिती देण्यात येत आहे. या सभांसाठी महिलांची संख्या मोठी असते असे गीतांजली ढोपे पाटील यांनी सांगितले.
 त्या म्हणाल्या, अशा बैठकांसाठी मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील महिलाही उपस्थित असतात. त्यांना तिहेरी तलाक रद्द झाल्याच्या निर्णयाची माहिती आम्ही देतो. त्याचबरोबर महिलांसाठीच्या विविध योजनांची माहिती देतो. अनेक सभा आणि बैठकांमध्ये महिला उस्फूर्तपणे सहभागी होतात. स्वतः प्रश्न विचारतात. शंका विचारतात. मतदानासाठी त्यांच्यामध्ये अधिक उत्साह आम्हाला दिसून येत आहे. ग्रामीण भागातही महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष उषाताई दशवंत यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या बैठका सुरू आहेत.
दरम्यान महिला आघाडीच्या नेत्या चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीत सांगलीत २९ एप्रिल (सोमवारी) महिलांचा मेळावा होणार आहे. चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीत आटपाडी येथेही महिलांचा मेळावा होणार असल्याची माहिती गीतांजली ढोपे पाटील यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post