विशाल दादांना मताधिक्य देण्याची ग्रामस्थांचे ग्वाही -जयश्रीताई पाटील यांचा सांगली विधानसभा मतदारसंघात प्रचार दौरा

सांगली : लोकसभा मतदारसंघाची अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारासाठी अंकली ,धामणी, इनामधामणी आणि  बामनी या गावांना जयश्रीवहिनी मदनभाऊ पाटील यांनी भेटी दिल्या.  चारही गावातून युवकांच्या आणि ज्येष्ठ लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला . गावातील उपस्थित युवकांनी आणि जेष्ठ नागरिकांनी यावेळी विशालदादा पाटील यांना अधिक मताधिक्य देऊ, अशी ग्वाही दिली. 
यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्राम दादा पाटील. मदन भाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, महावीर मगदूम, सुहास पाटील, आदिनाथ मगदूम, प्रदीप मगदूम, नेमगोंडा पाटील, शशिकांत पाटील, सुरज मगदूम, भरत खवाटे, प्रमोद शेटे, गणपती कोळी, प्रधान सूर्यवंशी, शांतिनाथ पाटील, सचिन कोळी, हिम्मत कोळी, विनोद सूर्यवंशी, निखिल कोथळे, प्रवीण पाटील, सुकुमार पाटील तसेच मदनभाऊ पाटील युवा मंचचे सर्व पदाधिकारी गावातील ज्येष्ठ नागरिक  महिला ,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post