सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना संभाजी ब्रिगेड, रिपाइं गवई गटाने शनिवारी जाहीर पाठिंबा दिला. यापूर्वी अनेक राजकीय पक्ष, संघटनांनी पाटील यांना पाठिंबा देत त्यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्रेयश नाईक यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. जिल्ह्याच्या विकासासाठी व सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक नावलौकिक कायम ठेवण्यासाठी विशालदादांना समर्थन देत आहोत. जनतेवर हुकुमशाही पद्धतीने लादलेल्या भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांच्या पराभवासाठी विशालदादा मैदानात उतरले आहेत. या लढाईत संभाजी ब्रिगेड विशालदादांच्या पाठिशी असल्याचे पत्रात म्हटले आहे. यावेळी कवठेमहांकाळ तालुक्याध्यक्ष सागर पाटील, कडेगाव अध्यक्ष सूरज महाडीक, विटा शहराध्यक्ष सोहेल होनवाड, रणजितसिंह मोरे उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया गवई गटानेही विशालदादा पाटील यांना पाठिंबा दिला. पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र गोंधळी यांच्या उपस्थितीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. जिल्हा अध्यक्ष संजय पाटील यांनी पाठिंब्याचा प्रस्ताव मांडला. मतदारातील घरोघरी जावून विशालदादांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी संजय मोहिते, किसन कांबळे, अविनाश गायकवाड, संतोष माने, हरिष आवळे उपस्थित होते.
Tags
सांगली प्रतिनिधी