महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार पूर प्रवण भागात महापालिका अग्निशमन विभागाकडून जनजागृती सुरू करण्यात आली असून आज दिनांक 24/6/2025 रोजी सांगली सूर्यवंशी प्लॉट येथे नागरिकांना संभाव्य पूर परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी पूर येण्यापूर्वी, पूर आल्यास त्या दरम्यान पूर व पूर येऊन गेल्यानंतर कोणती काळजी व दक्षता घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले . कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे यावेळी भागातील नागरिक उपस्थित होते.
Tags
सांगली मनपा