सांगली विधानसभा मतदारसंघातील अपंग बांधवांचा जयश्रीवहिनींना जाहीर पाठिंबा

आज विष्णूंआणा भवन सांगली, येथे सांगली विधानसभा क्षेत्रातील अपंग महिला, पुरुष यांनी जयश्री वहिनींना विधानसभेसाठी जाहीर पाठिंबा दिला. या बैठकीवेळी अपंग बांधवांनी महापालिका संदर्भातील, जिल्हा परिषद संदर्भातील अडीअडचणी सांगितल्या. या अडचणीमध्ये शासन स्तरावर आपण पाठपुरावा करावा असे आवाहनही केले. यावेळी बोलताना जयश्रीवहिनी म्हणाल्या अपंग बांधवांच्यासाठी लागेल ती मदत करू. त्याचबरोबर महानगरपालिका जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ज्या ज्या अडचणी येथील त्यावेळी मी स्वतः व मदनभाऊ पाटील युवा मंच तुमच्या पाठीशी सदैव राहील असे आश्वासन दिले.
यावेळी माननीय मदनभाऊ पाटील युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, माजी नगरसेविका सौ रोहिणीताई पाटील, आशा पाटील, रामदास कोळी, झाकीर मुजावर, शफिक खलिफा, जगु शेख, रेखा बेळंकी, राणी कामटे, दीपा गरांडे, महेंद्र एअरगट्टीकर, अनुजा पाटील, शैलेश व्यास आदी तसेच सांगली विधानसभा मतदारसंघातील बहुसंख्य अपंग बांधव, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post