सांगली येथील बायपासरोडवर पट्टनशेट्टी शोरुम ते सांगलीवाडी टोल नाक्या पर्यंत एकही पथदिवा नसल्याने रात्रीच्या वेळी त्या रोडवर अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. या रोडवर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. तसेच कष्टकरी महीलांची ये जा , नर्सींग कॉलेजच्या मुली, दवाखाने, महापालिकेचे प्रस्तुती गृह, पेशंट नातेवाईक, गॅरेजेस, ईतर व्यावसायिक व तेथील रहिवासी नागरिक यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या सर्वांना रात्रीच्या वेळी अंधारात त्रास सहन करावा लागत आहे. या सर्वांना रात्रीच्या वेळी अंधारात त्रास सहन करावा लागत आहे. यावर आवाज उठवण्यासाठी माननीय जयश्रीवहिनी यांच्या नेतृत्वाखाली त्या परिसरातील सर्व नागरिकांना बरोबर घेऊन रात्रीच्या वेळी अंधारात कंदील आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने त्या भागातील महिला उपस्थित होत्या. यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरजोरात घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना जयश्रीवहिनी म्हणाल्या महापालिकेला रस्त्यावर पथदिवे लावण्यासंदर्भात वेळोवेळी सूचना, निवेदने देण्यात आली होती तरी देखील कोणतीही दखल महापालिका प्रशासनाने घेतलेली नाही. नागरिकांच्या तक्रारीनुसार व भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना होऊ नये व महापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी येथे कंदील आंदोलन करून महापालिकेचा निषेध करण्यात येत आहे. यापुढे तात्काळ महापालिकेने पथदिवे लावण्याची कारवाही केली नाही तर रास्ता रोको व इतर मार्गाने मोठे आंदोलन करण्यात येईल. यावेळी घाडगे हॉस्पिटल कॉलेजच्या मुलींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
यावेळी डॉक्टर शरद घाडगे, माजी नगरसेविका रोहिणी पाटील, शेवंता वाघमारे, कांचन कांबळे, संगीता सुनके, मदनभाऊ पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, प्रकाश मुळके, अजित सूर्यवंशी, उदय पाटील सतीश साखळकर, रत्नाकर नांगरे, अविनाश जाधव, भाऊसाहेब पवार, शितल लोंढे, नितीन चव्हाण, मयूर बांगर, अवधूत गवळी, अमित लाळगे, भारत बोथरा, जयराज बर्गे, संजय गवळी, योगेश्वर सूर्यवंशी, विनायक सूर्यवंशी, ऋतुराज लाले, शुभम घोरपडे, अभिजीत कारंडे, सम्मेद पाटील, लकी ढिल्लो, करण कांबळे, विवेक रणदिवे, आदित्य कारंडे तसेच या भागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Tags
सांगली प्रतिनिधी