बिकानेर ते पुणे एक्स्प्रेस आता मिरजपर्यंत धावणार -माजी खा. संजयकाका पाटील यांची माहिती



बिकानेर ते पुणे एक्स्प्रेस (रेल्वे क्र.20475) ही साप्ताहिक रेल्वे मिरज जं. रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तारीत करणेबाबत माजी खा. संजयकाका पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री मा.अश्विनी वैष्णव यांचेकडे सततचा पाठपुरावा केला होता. त्यालाच सकारात्मक प्रतिसाद देवून बिकानेर ते पुणे एक्स्प्रेस ही मिरज जं. रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तरीत करणेबाबत मंजूरी देण्यात आली आहे. याबाबचे आदेश रेल्वे बोर्डचे संचालक संजय निलम यांचे सहीने पारीत करण्यात आले आहेत, अशी माहिती माजी खा. संजयकाका पाटील यांनी दिली. 

संजयकाका पाटील यांनी दिलेल्या महितीनुसार, बिकानेर ते पुणे ही साप्ताहिक एक्स्प्रेस सोमवार व मंगळवार दरम्यान धावते. ही एक्स्प्रेस मिरज जं. रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तारीत करणेची मागणी खूप दिवसांपासून प्रवाशांतून होत होती. त्याअनुषंगाने केंद्रीय रेल्वेमंत्री मा.अश्विनी वैष्णव यांचेकडे सततचा पाठपुरावा करुन ही रेल्वे मिरजपर्यंत विस्तरीत झालेस प्रवाशांच्या सोईचे होईल व त्याचा प्रवशांना नक्कीच फायदा होईल म्हणून या रेल्वेचा विस्तार मिरजपर्यंत करण्याची मागणी केली होती. सदर मागणीस आज मंजूरी मिळाली आहे. पुणे ते मिरज दरम्यान या एक्स्प्रेसला आता कराड, सातारा व लोणंद येथेही थांबे देण्यात आलेले आहेत. 
त्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post