जनतेतूनच निवडणूक लढवणार..... चिंतामणनगर येथे वृक्षारोपण कार्यक्रमावेळी जयश्रीताई पाटील यांची घोषणा.


चिंतामणी हाऊसिंग सोसायटी, चिंतामणनगर सांगली या परिसरामध्ये मा. मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्रीवहिनी मदनभाऊ पाटील यांचे शुभ हस्ते तसेच सावली बेघर लाभार्थी यांचे समवेत 100 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. जनतेच्या पाठिंब्यावर आणि कार्यकर्त्यांच्या बळावर, यंदा सांगली विधानसभा निवडणूक ही जनतेतूनच लढविणार असल्याचे यावेळी बोलताना वहिनींनी सांगितले.
काँग्रेस नेत्या, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीवहिनी यांनी, सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये एक हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून चिंतामणी हाऊसिंग सोसायटीमध्ये 100 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून आम्ही आवाहन करतो की सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये ज्यांना वृक्षारोपणासाठी झाडे लागतील, अशा सर्व नागरिकांना मोफत झाड देण्याची सोय युवा मंचाकडून करण्यात आली आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
यावेळी माननीय मदनभाऊ पाटील युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, दिनेश सादिगले, दीपक गुडे, महेश काळे, भारत ऐवळे, गडवीर काका, समाधान सरगर, दिलीप जाधव, सचिन शहा, शाहनवाज फकीर, संभाजी कदम, इरफान मुजावर, राजू पाटील, सुभाष ककडे, लक्ष्मण गडदे, विष्णू माने आधी प्रमुख पदाधिकारी व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post