सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीने आज शनिवार दिनांक 4 मे 2024 रोजी सांगली येथे पान दुकानदार खोकी धारक व छोटे गाळेधारक यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये जयश्रीताई मदन पाटील यांनी मदन भाऊंच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका क्षेत्रात 1800 खोकीधारकांचे मुव्हेबल व पक्क्या गाळ्यात पुनर्वसन करून त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे व ज्या ज्या वेळी अडचण आल्या त्या त्यावेळी मदन भाऊंनी पान असोसिएशनला सहकार्य करून ताकद दिली आहे म्हणूनच आजही सांगली जिल्हा पान असोसिएशन व सर्व खोकीधारक ,छोटे गाळेधारक वसंतदादा घराण्याच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी गोरगरिबांचे प्रश्न मदनभाऊनी सोडवले आहेत व येथून पुढे विशाल दादा निश्चितपणे आपले प्रश्न सोडवतील हा विश्वास आपणास आहे याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री रत्नाकर नांगरे यांनी महाराष्ट्रामध्ये कोणत्याही महानगरपालिकेने एवढ्या मोठ्या प्रमाणात खोकी पुनर्वसन योजना राबवली नाही परंतु मदन भाऊंच्या नेतृत्वाखाली सांगली महानगरपालिका क्षेत्रात एक चांगली योजना या ठिकाणी राबवली आहे तसेच ज्या ज्या वेळी अडचणी येतील त्यावेळी विशाल दादा व जयश्री वहिनी आपल्या पाठीमागे ठामपणे उभा राहतील याची गॅरंटी असल्याकारणाने सांगली जिल्हा पान असोसिएशन व सर्व खोकीधारक छोटे गाळेधारक या सर्वांनी विशाल दादा यांना प्रचंड मतदान करून निवडून देण्याचा निर्धार आजच्या मेळाव्यात जयश्री वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे यावेळी युसूफ जमादार, राजू पागे, मयूर बांगर, लालासाहेब तांबोळी, दत्ता शेट्टे, प्रकाश कोकाटे राजू फोंडे इत्यादी कार्यकर्त्यांची भाषणे यावेळी झाली.
Tags
सांगली प्रतिनिधी