सांगली प्रतिनिधी
सांगली शहरातील शंभर फुटी रस्त्यावरील कॅफेतील बलात्काराच्या घटनेनंतर शहरात संतप्त पडसाद उमटले. त्यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने आक्रमक भूमिका घेतली. याची पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी गांभिर्याने दखल घेत तपासणीचे आदेश दिले. त्यानुसार शहर विभागात मंगळवारी विविध कॅफेंवर पोलिसांच्या पथकाने धाडी टाकल्या. उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही तपासणी मोहीम करण्यात आली. उद्यापासून निर्भया पथकातील पोलिसांना याठिकाणी पाठवले जाणार आहे.
शंभर फुटी रस्त्यावरील हँग ऑन कॅफेत गुंगीचे औषध देवून बलात्काराची घटना समोर आली. त्यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी हँग ऑन कॅफेची तोडफोड केली. त्यानंतर बंदिस्त कंपार्टमेंट असणाऱ्या विश्रामबाग परिसरातील अन्य दोन कॅफेंची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर शिवप्रतिष्ठान युवाच्या सोळा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर विविध राजकीय, सामाजिक संघटनांनी पोलिस अधीक्षकांना याबाबत निवेदन दिले.
त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी गांभिर्याने दखल घेतली आहे.
तातडीने कॅफे चालकास सहआरोपी करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना कॅफे तपासणीबाबत सूचना दिल्या. त्यानंतर येथील कंपार्टमेंटबाबत महापालिकेसह अधीक्षकांनी सूचना पत्र दिले. त्यानंतर पालिकेच्या पथकाने प्रभागनिहाय पथके नियुक्त केली. आज उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दोन पथके तयार केली. त्यात निर्भया आणि दामिनी पथकाचा समावेश करण्यात आली. शहरातील कॅफेंवर धाडी टाकत तेथील तपासणी करण्यात आली. सायंकाळपर्यंत सांगली शहरातील कॅफेंची तपासणी करण्यात आली. उद्यापासून ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे.
Tags
सांगली प्रतिनिधी