प्रभाग 14 च्या जाहीर नावांमध्ये काल संध्याकाळपर्यंत केदार खाडिलकर यांची भाजप कडून उमेदवारी निश्चित असताना अचानक त्यांचे नाव वगळून दुसरे नाव पुढे आल्यामुळे गावभागातील तसेच प्रभाग 14 मधील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
आज आमदार सुधीर दादा गाडगीळ यांची ब्राह्मण समाजातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन ही नाराजी त्यांच्या कानावर घातली.
आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी मी खाडिलकर यांच्या उमेदवारीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत आहे असे आश्वासन भेटीसाठी आलेल्या सर्व सदस्यांना दिले.
केदार खाडीलकर यांच्या उमेदवारीसाठी ब्राह्मण समाज हा समाज म्हणून मागे आहेच, पण त्या बरोबरीने गेली 30/ 35 वर्ष भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांचे काम असून सुद्धा त्यांचे नाव कोणतेही कारण न देता अचानक वगळणे हे खूप चुकीचे असल्याचे मत नंदकुमार बापट सर यांनी व्यक्त केले.
यावेळी अरुण कुलकर्णी, प्रदीप ताम्हणकर, मंगेश ठाणेदार, नितीन खाडिलकर, शैलेश केळकर, वल्लभ सोहनी, रणजीत पेशकार, प्रथमेश वैद्य, सचिन परांजपे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
सांगली प्रतिनिधी