प्रभाग क्रमांक १४ मध्ये शक्ति केंद्रप्रमुख आणि बूथ प्रमुख महत्त्वपूर्ण बैठक

 



सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०२६ च्या अनुषंगाने आज प्रभाग क्रमांक १४ सर्व शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ केंद्रप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.


आगामी निवडणूक अधिक संघटित, नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीने लढवण्यासाठी या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. प्रत्येक शक्ती केंद्रप्रमुख व बूथ केंद्रप्रमुख यांची भूमिका ही विजयाचा कणा असल्याने, त्यांच्या जबाबदाऱ्या व कार्यपद्धती यावर विशेष भर देण्यात यावा असे आव्हान केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


यावेळी भाजपा नेते गौतम पवार, भाजपा सांगली जिल्हा युवा अध्यक्ष शांतिनाथ कर्वे, भाजपा सांगली जिल्हा शहर सचिव उदय मुळे, स्मिताताई पवार, सांगली जिल्हा शहर कार्यकारणी सदस्य निलेश हिंगमिरे, राजू बावडेकर आदी भाजपा पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ केंद्रप्रमुख उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post