सांगली प्रतिनिधी
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार रणसंग्राम अधिक आला आहे, उमेदवार अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर गाळणी लागल्याने ७८ जागेसाठी अखेर 381 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत, अपक्षासह तब्बल 301 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे अनेक प्रभागातील चित्र स्पष्ट झाले असेल तरी बहुतेक ठिकाणी चौरंगी लढत ठरणार आहे,
महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे,
या निवडणुकीसाठी प्रारंभिक तब्बळ 1062 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते छाननी नंतर 380 अर्ज अवैद्य ठरले होते, अर्ज माघारी साठी शुक्रवारी दुपारी तीन पर्यंत अंतिम मुदत होती, या मुदतीत 301 उमेदवारांनी माघार घेतल्याने 78 जागेसाठी 381 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत काँग्रेस राष्ट्रवादी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या प्रमुख पक्षाने बंडखोरीची लागण झाली असून बंडखोरी टोपण या नेत्यांना काही प्रमाणात यश आले आहे महाआघाडीसाठी आणि महायुतीत बिघाडी झाल्यामुळे तीन प्रभागात तिरंगी लढत होणार आहे त्वरित बहुतांशी प्रभागात चौरंगी आणि बहुरंगी लढत होणार आहेत,
महाआघाडी आणि महायुतीत काही ठिकाणी समन्वय न झाल्याने किमान तीन प्रभागात तिरंगी लढत निश्चित झाली आहेत, बहुतांश प्रभागातील भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, एकनाथ शिंदे सेना, उद्धवसेना, आणि अपक्ष उमेदवार मुळे चौरंगी आणि बहुरंगी लढती होणार असून मत विभाजनाचा फटका कुणाला बसणार याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे,
प्रभाग 11 ड मध्ये माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पणतू आणि माझी मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षल पार्टी हे काँग्रेसकडून तर त्यांच्याविरोधात भाजपकडून मनोज सरगर मैदानात आहेत, एकूण 78 प्रभागात प्रभाग 11 ड आणि प्रभाग 16 ब या दोन प्रभागात दुरंगी लढत होत आहे प्रभाग 11 मध्येच अ ब आणि क गटात चौरंगी तिरंगी लढत होत आहे,
महापालिका निवडणूक अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मिरजेत प्रभात सात मध्ये दोन महिला उमेदवारांनी माघार घेऊन काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे प्रभात सात मधील गायत्री कुलोळी व शुभांगी देवमाने या काँग्रेस उमेदवारांनी माघार घेतली असून शुभांगी देवमाने या आता जनस्वराज्य पक्षातर्फे लढणार आहेत,
सांगलीत माघार घेतलेल्या मध्ये माजी नगरसेवक सागर घोडके, यांच्यासह भाजपाचे अविनाश मोहिते, नितीनकाका शिंदे, उदय मुळीक, शरद नलावडे, राहुल बोळाज, शांतिनाथ कर्वे, गीतांजली मद्रासी, नेमगोंडा पाटील, केदार खाडिलकर तसेच प्रभाग क्रमांक 18 मधून राजू नलावडे , खणभाग प्रभाग क्रमांक 16 मध्ये रणजीत जाधव, जयमाला सावर्डेकर पाटील, सुरैया गवंडी, गणेश तिवडे, सोफिया तासगावकर, सुवर्णा जाधव, सायरा बावा, गायत्री गवळी, अश्विनी खंडागळे, यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. .
Tags
सांगली प्रतिनिधी