सूनबाईसाठी सासूबाईची माघार, प्रभाग 10 मध्ये भाजपा उमेदवार रिद्धि पटेल म्हामुलकर यांना विध्या बाबर यांचा पाठिंबा

 



सांगलीच्या प्रभाग क्रमांक दहा मधून सर्वसाधारण महिला गटामध्ये भाजप तर्फे रिद्धी पटेल म्हामुलकर यांनी तर अपक्ष म्हणून विद्या किरण बाबर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शेवटच्या दिवशी सौ विद्या बाबर यांनी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार रिद्धी पटेल म्हामुलकर यांना पाठिंबा दिला तसेच रिद्धी पटेल म्हामुलकर या मला सुनबाई लागत असल्यामुळे सुने विरुद्धा लढणे योग्य वाटत नाही म्हणून मी या गटातून माघार घेतली आहे ,असे त्यांनी यावेळी सांगितले आणि त्यांच्या प्रचारात सक्रिय होऊन त्यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावू असे यावेळेस सांगितले त्यामुळे प्रभाग क्रमांक दहा मध्ये यांच्या माघारीमुळे  म्हामुलकर गट यांना दिलेल्या पाठिंबामुळे सर्वसाधारण महिला उमेदवाराची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे

Post a Comment

Previous Post Next Post