भारतीय जनता पार्टीचे मजबूत पॅनल प्रभाग 10 मध्ये रिंगणात..




सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे अधिकृत पॅनल प्रभाग क्रं. १० मध्ये मजबूतपणे रिंगणात आहे. अनेक दिग्गज व अभ्यासू कार्यकर्त्यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने प्रभागात नवचैतन्य निर्माण झाले आहे. महानगरपालिकेचे ज्येष्ठ अभ्यासू नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, प्रकाश मुळके, भाजपाचे युवा नेते मकरंद म्हामुळकर यांच्या पत्नी रिद्धी पटेल,झोपडपट्टी संघर्ष समितीचे सूरज पवार यांच्या पत्नी गीता पवार हे या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आहेत. प्रभागात या पॅनल ची जोरदार चर्चा असून हे  पॅनल शेवट च्या मतदारांनपर्यंत पोहचली आहे.
भाजप नेते रोनक शहा,अपक्ष उमेदवार विद्या बाबर,सुरेश चौधरी, शिवसेना बंडखोर सूरज पवार यांचा भाजपा युतीला पाठिंबा देऊन आपला अर्ज माघार घेतलेला आहे

Post a Comment

Previous Post Next Post