निवडणुकीच्या जाहीरनाम्याचा विसर , आश्वासने हवेत?




गेल्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी महानगरपालिकेतील जनतेसमोर शहराचा कायापालट होईल अशी वेगवेगळी मोठी स्वप्न जनतेच्या समोर मांडली होती.  सर्वच पक्षांनी शहराच्या विकासासाठी स्वातंत्र्य जाहीरनामे प्रसिद्ध केले होते. यामध्ये रोजगार निर्मिती असेल, शेरी नाल्याचा प्रश्न , वाहतुकीच्या समस्या, 24 तास पाणीपुरवठा, आरोग्यसेवा , पुराच्या पाण्याची समस्या, चांगले रस्ते  यांसारखी असंख्य आश्वासने दिली होती . ती अजूनही प्रत्यक्षात उतरलेली दिसत नाहीत. मग ही आश्वासने फक्त इलेक्शन पुरतीच असतात का ? असा प्रश्न सामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे. 

  • 2018 जाहीरनाम्यात दिलेले प्रमुख आश्वासने

  1. महानगरपालिकेतील सर्व शाळा डिजिटल करणार
  2. ओपन जीम ,मॉर्निंग वॉक स्पेस ,क्रीडांगण
  3. शेरी नाल्याचा प्रश्न
  4. शुद्ध पाणी पुरवठा
  5. सांगलीत रिंग रोड निर्मिती
  6. ट्रॅफिक ची समस्या
  7. चांगले रस्ते
  8. सुसज्य बसस्थानक
  9. पुराच्या पाण्याचा प्रश्न
  10. कृष्ण नदीकाठ सुशोभीकरण

 आजही अनेक प्रभागात मूलभूत सुविधांचा अभाव आहे आत्ता येणाऱ्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाकडून पुन्हा नव्याने तीच तीच आश्वासने देण्याची मालिका सुरू आहे

पण यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची काय झाले असा सवाल मतदार करत आहे

Post a Comment

Previous Post Next Post