बालेकिल्ला ढासळणार की अभेद राहणार ?

आज सकाळ पासून सोशल मीडिया व सर्व सामान्य जनते मध्ये एक बातमी प्रसारती होत असून या मध्ये प्रभाग क्रमांक 14 मधील संभाव्य 4 उमेदवारांची नावे चर्चेत आहेत .सदर नावे प्रभागतील विशिष्ट 4 चार गल्ली मधील नावे प्रसारित होत आहे .

ह्या ठराविक 4 गल्ल्या पुरते पक्षाने सर्वे केला आहे . की फक्त सर्वे च्या नावा खाली नेहमी प्रमाणे उमेदवारी लादली जात आहे का अशी नागरिकांच्यात व कार्यकर्त्यांच्यात चर्चा चालू आहे.

त्यामुळे प्रभाग क्रमांक 14 चे प्रतिनिधित्व पुन्हा एकदा एकच ठरावीक भागाकडे येणार असल्या मुळे रामनगर , काळी वाट, गणपती पेठ , हरभट रोड , गुजर बोळ, बुरुड गल्ली, गवळी गल्ली जैन बस्ती, कोल्हापूर रोड स्टँड परिसर ह्या भागातील सामाजिक कार्यकर्ते च्या वरती अन्याय झाला आहे अशी जोरदार चर्चा चालू आहे. 

जर हे समीकरण अशा पद्धतीने तयार झाले तर इच्छुक उमेदवारांचा फटका येणाऱ्या काळात बालेकिल्ला समजणार्‍या पक्षाला नक्कीच बसणार आहे

Post a Comment

Previous Post Next Post