लिंगायत बोर्डिंगच्यावतीने रक्तदान शिबिर उत्साहातसर्व पोटजातींच्या वधू-वर मेळाव्यास प्रतिसाद

सांगली :
येथील श्री मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगच्यावतीने बसव जयंती महोत्सवांतर्गत रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. यावेळी सुमारे 54 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. सोबतच लिंगायत सर्व पोटजातींचा वधू-वर मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी विवाहेच्छुक तरुण-तरुणींसह पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
बोर्डिंगचे अध्यक्ष सुशील हडदरे यांच्याहस्ते शनिवारी वधू-वर मेळावा आणि रविवारी रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. वधू-वर मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी हडदरे म्हणाले, सध्याच्या धावपळीच्या जीवनात विवाह आणि त्यादृष्टीने अनुरूप जोडीदार, कुटुंबवत्सल सून, जावई मिळणे मुश्कील झाले आहे. याचा विचार करून बोर्डिंगच्यावतीने सर्व जाती-पोटजातींचा वधू-वर मेळावा आयोजित केला होता. त्यानुसार अत्याधुनिक वेबसाईट आणि त्यावरून वधू-वरांसह पालकांनाही स्थळे उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात आली आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने समाजातील एकोपा जपला जातो.
दरम्यान रविवारी रक्तदान शिबिर पार पडले. एमएस आय ब्लड बँकेच्यावतीने रक्तसंकलन करण्यात आले. यावेळी सुमारे 54 हून अधिक दात्यांनी रक्तदान केले. यादरम्यान विविध आजार, नियमित औषधांच्या कारणास्तव रक्तदानास मुकावे लागले.
यावेळी संचालक सुधीर सिंहासने, सुनील कोरे, विनायक शेटे, व्यवस्थापक सतीश मगदूम यांच्यासह समाजबांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post