गोवा पणजी (विशेष प्रतिनिधी)
लातूर चे माजी खासदार तथा सुप्रीम कोर्ट चे ॲडव्होकेटे संसद रत्न प्रोफेसर डॉक्टर,ॲडव्होकेट सुनील वत्सला बळीराम गायकवाड यांना इमेज इंटरनेशनल रिसर्च असोसिएशन गोवा,नेशनल प्रधान मुखिया सरपंच संघ,न्यू दिल्ली आणि बाबू जगजीवन राम कला संस्कृती आणि साहित्य अकादमी,दिल्ली यांच्या वतीने
बाबु जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमी दिल्ली,महाराष्ट्र शाखा यांच्या कडून लॉर्ड गौतमबुद्ध लाईफ टाईम अचिव्हमेंट इंटरनेशनल एक्सलेन्स अवार्ड डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना गोवा येथील कला सांस्कृतीक भवन येथील भव्य अशा सभागृहात देशातील विविध राज्यातून आलेल्या प्रतिनिधी च्या उपस्थितीत स्मृती चिन्ह देऊन सत्कार करून गौरव करण्यात आला.
लातूर चे लोकप्रिय संसद रत्न माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर ॲडव्होकेट
डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी खासदार म्हणून केलेले कामे लातूर लोकसभा मतदार संघात दोनशे बेड चे सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पासपोर्ट सेवा केंद्र,NEET Exam सेंटर,नेशनल हाईवे,अनेक नवीन रेल्वे सुरू, पिट लाईन,रेल्वे स्टेशन चे आधुनिकीकरण,हिंदी लायब्ररी,उदगीर,लातूर रोड,लातूर रेल्वे स्टेशन वर नवीन प्लेटफॉर्म,तिन्ही ठिकाणी रेल्वे दादरा,खासदार फंड मधून रेल्वे स्टेशन वर प्रवाशांना बसण्यासाठी स्टील चे खुर्ची सोफा,लातूर रेल्वे स्टेशन वर व्हीआयपी लाउंज,रेल्वे बोगी कारखाना,जलयुक्त शिवार कामासाठी खासदार निधीतून करोडो ची कामे,रेल्वे नी पाणी आणले,लातूर शहरात खासदार फंड मधून १०० बोरवेल दिले,लातूर शहरात महिला आणि पुरूष साठी स्वच्छता गृह उभारले, खासदार फंड मधून शहरात सिटी बस चा थांबा बांधून दिला,सांसद आदर्श ग्राम अनसरवडा चा संपूर्ण विकास केला,जवळपास ७०० गावांमध्ये वेगवेगळ्या कामा साठी खासदार निधी दिला,कैंसर आणि हार्ट पेशंट ला प्रधानमंत्री यांच्या कडून जवळपास करोडो पेक्षा ज्यास्त मदत केली,दीडशे पेक्षा ज्यास्त वकिलांना भारत सरकार कडून नोटरी बनविण्यासाठी शिफारस करून नोटरी बनवले,लातूर शहरातील ब्लैक स्पॉट बंद केले,टेंभुर्णी रस्त्या साठी अनेक वेळा लोकसभेत मागणी केली,रत्नागिरी नागपूर हाईवे सुरू व्हावा यासाठी लोकसभेत मागणी केली,अनेक अनाथ मुला मुलीना मदत केली,गरीब मुलाना शिक्षणासाठी मदत केली,अशा सर्व कामाची दखल घेऊन गोवा पणजी येथे हा अंतरराष्ट्रीय अवार्ड देऊन डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला मुंबई च्या पहिल्या दलित महापौर स्नेहल अंबेकर,माजी सैनिक अधिकारी डांगले,संजय मोहिते,हेमंत कोलंबकर,प्रा.गोरख साठे,वसंतराव महाडीक,राहुल उके,प्रोफेसर डॉ बी एन खरात,निलेश कारेकर,पांडुरंग अंबुलगेकर,धनजय जगदाले,सरपंच पंकज शेळके आणि मणिपूर,इंपाल,सिक्कीम,बिहार,उत्तर प्रदेश,महाराष्ट्र,गुजरात,कर्नाटक,आदी राज्यातून विविध क्षेत्रांतील मान्यवर कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
या कार्यक्रमात संसद रत्न डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या हस्ते अनेक पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
Tags
लातूर प्रतिनिधी