लातूर प्रतिनिधी
लातूर चे माजी खासदार संसदरत्न प्रोफेसर डॉक्टर ॲडव्होकेट सुनील बळीराम गायकवाड यांना लंडन ऑर्गनायझेशन स्कील डेव्हलपमेंट कडून हार्वर्ड यूनिवर्सिटी अमेरिका येथे भव्य अशा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमा मध्ये इंटरनॅशन सोशल इम्पॅक्ट अवार्ड २०२४ हा अत्यंत मानाचा जागतिक पुरस्कार भारतातून एकमेव असे डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना मिळाल्याबद्दल लातूर येथील दयानंद कला महाविद्यालया च्या सभागृहात महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन च्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकिशन भन्साळी (अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा) उद्घाटक ह.भ.प.महादेव महाराज आडसुळ धाराशिव, युवा भीम सेना संस्थापक अध्यक्ष पंकज भाऊ काटे,बालाप्रसाद सोमानी ( शिवसेना शिंदे अ सु जाती आघाडी) संयोजक सुफी सय्यद शमोशोद्दीन,सरपंच संभाजी वायाळ,माधव केंद्रे,सहारा शेख,उषाताई धावारे या मान्यवरांच्या हस्ते डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचा मोठा गुलाब हार आणि स्मृती चिन्ह शाल देऊन गौरव करण्यात आला.
डॉ सुनील बळीराम गायकवाड हे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान पदवी चे शिक्षण घेतले पाहिजे,स्पर्धा परीक्षेची तयारी करून परीक्षा दिली पाहिजे,हे सगळे जरी चांगले असले तरी प्रत्येकांनी आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे त्यांच्या शी सुसंवाद ठेवला पाहिजे. मुलगा असो की मुलगी त्यांनी आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे त्यांचा आदर कायम ठेवला पाहिजे. काल्पनिक देवाची पूजा करण्यापेक्षा आपले दैवत असलेल्या आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे.असे परखड मत डॉ गायकवाड यांनी मांडले.
याच कार्यक्रमात नेताजी सुभाष चंद्र भोस जीवन गौरव पुरस्कार विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना देण्यात आले. सुवर्णा घुले सोलापूर,सविता कांबळे औसा,करुणा कांबळे किनगाव,इंदू शिवाजी बटणपूरकर,मंजुषा ताई निंबाळकर ( वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष),उत्तम कसबे लातूर,सैनिक राजाराम साबळे,रामचंद्र तांदळे लातूर,सोपान बांगर (छत्रपती संभाजी नगर) सुमित सातपुते (लातूर) अनंतराव घोगरे कळंब, राजेंद्र बारगुले कळंब,सय्यद लायक अली कळंब,डॉ अजय बनसोडे लातूर,किशोर गायकवाड इत्यादी मान्यवरांचे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष उपस्थित होते.
Tags
लातूर प्रतिनिधी