"उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले. विरोधकांनी आरक्षणाचा विषय विनाकारण चर्चेचा
करून सर्वसामान्यांच्या मूळ प्रश्नांना बगल दिली आहे. शिराळा वाळवा विधानसभा मतदार संघात आपल्या विचारांचा आमदार निवडून देण्यासाठी सर्वांनी महायुतीचे उमेदवार सत्यजितbदेशमुख यांच्या पाठीशी ठामपणे राहावे, " असे प्रतिपादन अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांनी केले. कुरळप (ता. वाळवा) येथील भाजप
संपर्क कार्यालयात अण्णासाहेब विकास मंडळातर्फे विविध योजनांची माहिती व संपर्क भेट आयोजित करण्यात आली
होती. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकbपाटील, सरपंच डॉ. मदन शेटे, व्ही.टी. पाटील, मारुती जाधव यांची प्रमुख
उपस्थिती होती.
आमदार पाटील म्हणाले, "सारथी योजनेच्या माध्यमातून मराठा समाजाची आर्थिक प्रगती होत आहे. मराठा कुरळप येथे आमदार नरेंद्र पाटील यांनी भाजप संपर्क कार्यालयात विविध
योजनांची माहिती दिली. व्यासपीठावर अशोक पाटील, व्ही. टी. पाटील आदी. समाजाच्या तरुणांच्या अडीअडचणी
जाणून घेण्यासाठी गावोगावी भेट देत आहे. भाजपने सामान्य व्यक्ती पाहून मला आमदार केले आहे. तरुणांनी
नोकरीसह व्यवसायांकडे वळले पाहिजे, यासाठी ग्रामीण भागात नऊ कोटी रुपयांवर मराठा तरुणांना कर्ज वाटप केले
आहे." अशोक पाटील म्हणाले, "विद्यमान आमदारांनी समाजाचे मूलभूत प्रश्न बाजूला ठेवल्याने आज सर्वसामान्य
जनता सत्यजित देशमुख यांच्या बाजूने खंबीरपणे उभी आहे. त्यांना आमदार करण्यात कुरळप त्यांच्या पाठीशी आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यात अण्णासाहेब पाटील महामंडळाचे मोठे योगदान आहे. व्यवसायानिमित्त
समाजाला आर्थिक हातभार लागला, तर राज्यातील मराठा तरुण एकमेकांना जोडले जातील अन् त्यातून मोठा विकास
साधला जाईल. "
व्ही. टी. पाटील म्हणाले, “दिवंगत शिवाजीराव देशमुख यांचे जिल्ह्याच्या विकास कामांत मोठे योगदान आहे.
सत्यजित देशमुख यांची विजयश्री आता निश्चित आहे. सर्व कार्यकर्त्यांनी प्रचार चांगल्या पद्धतीने करा. चिन्ह घरोघरी पोहोचवा. " डॉ. मदन शेटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिवाजी पाटील यांनी आभार मानले.
Tags
शिराळा प्रतिनिधी