रामोशी समाजाच्या वतीने सत्यजित देशमुख यांना पाठींबा

सत्यजीतभाऊंना रामोशी समाजाचा पाठिंबा !

शिराळा विधानसभा महायुती भाजपचे अधिकृत उमेदवार मा.सत्यजीतभाऊ देशमुख यांच्या प्रचारार्थ पेठ येथे रामोशी समाजाच्यावीने प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी समस्त रामोशी समाजाच्या वतीने पाठींबा जाहीर करण्यात आला. रामोशी समाजाच्या पाठिंब्याने यंदा मतदारसंघात भाजप महायुतीचा ऐतिहासिक विजय होईल, असे वक्तव्य केले.

यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.दौलत शितोळे (नाना), एम.एम.ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.मोहन मदने (नाना) यांची प्रमुख उपस्थिती होती. 

रामोशी समाजाचे बांधव, महिला-भगिनी तसेच महायुतीचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post