अखिल भारतीय होलार समाज संघटनेचा मा. संजयकाका पाटील यांना जाहीर पाठिंबा..!

 



राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. संजयकाका पाटील यांना सर्व सामाजिक स्तरावरुन मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. आज अखिल भारतीय होलार समाज संघटनेने राष्ट्रीय अध्यक्ष मा. शहाजी पारसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांगली जिल्हा अध्यक्ष मा. शिवाजी भाऊ गुळवे यांच्या प्रमूख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. संजयकाका पाटील यांना समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर करून तासगाव - कवठेमहांकाळ मधील आमचा समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे नमूद केले.


Post a Comment

Previous Post Next Post