सरपंच प्रतिष्ठाण संघटनेचा आमदार विक्रम दादा सावंत यांना जाहीर पाठिंबा


सरपंच प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचा जत विधानसभेतील स्थानिक भूमिपुत्र विद्यमान आमदार विक्रम दादा सावंत यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. 
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सरपंच भगवानदास केंगार यांनी हे पाठिंबा जाहीर केला आहे स्थानिक भूमिपुत्र व जत तालुक्यातील अनेक सामाजिक राजकीय सांस्कृतिक विकास कामांत आमदार विक्रम सावंत यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल व भविष्यात तालुक्यातील अनेक कामे मार्गी लावतील अशी अपेक्षा ठेवून या संघटनेने जाहीर पाठिंबा दिलेला आहे.
यावेळी आमदार विक्रम दादा सावंत व सरपंच प्रतिष्ठाणचे संस्थापक सरपंच भगवानदास केंगार.पाच्छापुर चे सरपंच विनोद जाधव.अमृतवाडीचे उपसरपंच राहुल बाबर.टोणेवाडीचे जेष्ठ नेते साहेबराव टोणे.सामाजिक कार्यकर्ते जिवन केंगार.संजय केंगार.गणेश ऐवळे.गणेश पाटील. यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post