सांगली शहर व ग्रामीण भागातील विकासासाठी आपण सर्वांनी मिळून जयश्री मदन पाटील यांना साथ देऊन शहर व ग्रामीण भाग सुजलाम सुफलाम बनवुया, असे हर्षवर्धन प्रतीक पाटील म्हणाले.
सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्रीमती जयश्री मदन पाटील यांच्या प्रचारार्थ आज युवा नेते हर्षवर्धन प्रतिक पाटील यांनी गवळी गल्ली, पेठ भाग , गणपती पेठ, मगरमच्छ काॅलनी, बुरुड गल्ली, जामवाडी, दत्तनगर, काकानगर, साईनगर, पसायदान कॉलनी या भागामधील नागरिकांशी संवाद साधुन जयश्री मदन पाटील यांना मताधिक्क्याने विजयी करा असे आवाहन केले. यावेळी हर्षवर्धन प्रतीक पाटील बोलताना म्हणाले की ग्रामीण भागातील व शहरातील विविध समस्याचे निवारण लवकरात लवकर जयश्री पाटील सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार आहेत.
यावेळी सोनिया होळकर , शशिकांत नागे, अजित सूर्यवंशी, योगेश्वर सुर्यवंशी, मयुर बांगर, कय्युम पटवेगार, अवधुत गवळी, विशाल हिप्परकर आदी उपस्थित होते
Tags
सांगली प्रतिनिधी