सांगली, दि. १७ : गेल्या दहा वर्षात कर्नाळ गावासाठी मोठा निधी देऊन गावाचा कायापालट केला आहे. यापुढेही निधी कमी पडू दिला जाणार नाही. हे गाव विकास कामांच्या बाबत आणखी प्रगत करू, अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली. गावात आयोजित प्रचार फेरीच्या वेळी ते बोलत होते.
कर्नाळ येथे केशव पाटील, दिलीप अवताडे, प्रशांत मगदूम यांनी प्रचार फेरीचे आयोजन केले होते.
कर्नाळ गावामध्ये सुधीरदादा गाडगीळ यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणांच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ प्रचंड संख्येने उपस्थित होते.
प्रचारफेरी गावातील मुख्य रस्ते तसेच प्रत्येक चौकातून काढण्यात आली. झेंडा चौक, वीर एकनाथ चौक, विजय भारत चौक, छत्रपती चौक, मयूर चौक, जय हिंद चौक, गजराज चौक, जय किसान चौक,एकता चौक, मारुती मंदिर या मार्गावरून प्रचार फेरी काढण्यात आली.
प्रत्येक घरातून दादांच्यावर पुष्पवृष्टी होत होती. तसेच प्रत्येक घरासमोर महिला दादांचे औक्षण करीत होत्या.
गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते.
दादांनी गावात ५१ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीच्या माध्यमातून प्रत्येक गल्लीत चांगले रस्ते आणि गटारांची सोय झाली आहे. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी भाषणात देण्यात आली.
प्रचार फेरीच्या सुरुवातीस दादांनी जय भीम तरुण मंडळास तसेच समाज मंदिरात भेट दिली. भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.सुधीरदादांनी मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले.प्रचार फेरी दरम्यान कर्नाळ गावातील नाभिक समाजाने सुधीरदादा गाडगीळ यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी महादेव जाधव, आनंद जाधव, सुरेश जाधव, पांडुरंग जाधव, रोहन शिरदावडे, सुधीर जाधव, पोपट गऱ्हाडे, बाळकृष्ण जाधव, सर्जेराव जाधव, सुरज जाधव, दीपक जाधव, सागर गवळी, विनायक जाधव, महेश जाधव हे समाजबांधव उपस्थित होते.
प्रचार फेरीत दिलीप अवताडे, केशव पाटील, प्रशांत मगदूम, कुमार पुजारी, ज्येष्ठ नेते विष्णू पाटील, चंद्रकांत पाटील, राजाराम मिसाळ, किरण कदम, सचिन पाटील, शिवाजी पाटील, राहुल कांबळे, सुनील सुतार, अभिजीत मिसाळ, महिला आघाडी प्रमुख अश्विनी तारळेकर, रूपाली पाटील, सुलोचना गिड्डे, शैलजा वरणे, विकास पाटील, सुरज शिंदे, सिद्धू कदम, रोहन शिरतावडे, शंकर पाटील, राजेंद्र चव्हाण, संजय माने, पांडुरंग गराडे, पांडुरंग जाध, चंद्रसाब कुपवाडे , सूर्यकांत मोहिते, उत्तम पाटील, शरद पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Tags
सांगली प्रतिनिधी