क्रांतिकारकांची भूमी असलेला शिराळा व वाळवा तालुक्यातील जातीयवादी शक्तीची बिजे पेरू पाहणाऱ्यांचा विधानसभा निवडणूकीत मतदारांनी पाडाव करावा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले. कापूसखेड (वाळवा) येथे शिराळा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. मानसिंगराव नाईक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, उमेदवार, आमदार मानसिंगराव नाईक व यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक प्रमुख उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, पक्ष फोडा फोडीचे हीन राजकारण करून महायुती सत्तेत आली आहे. ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच मंत्री बनवले गेले. बंदुका काढून भिती दाखवणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवाऱ्या दिल्या गेल्या आहेत. त्यांना विरोध करणाऱ्यांना धमकावले जाते. इडी व सीबीआयची भिती दाखवली जाते. ही दडपशाहीमुळे हद्दपार करून सरकार पुन्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणावे. त्यासाठी मानसिंगभाऊंच्या तुतारी वाजणारा माणूस चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे.
माजी राज्यमंत्री श्री. नाईक म्हणाले, आपले नेते शरदचंद्र पवार, जयंतराव पाटील व माझ्याप्रमाणेच मानसिंगभाऊ विकासाच्या वाटेवर चालत आहे. त्यांनी पाच वर्षात मोठी विकासकामे केली आहे. त्यांच्या विरोधी भाजप उमेदवाराचे विकासात कोणतेही योगदान नाही. ते फक्त पक्षाच्या नावाने मते मागत आहेत. प्रचारात विकासाचा आभास असताना वेगळेच चित्र रंगविले जात आहे. महागाईने राज्यातील जनता मेटाकुटीस आली आहे. सर्वत्र असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. हे रोखण्यासाठी व लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी तुतारी चिन्हासमोरील बटण दाबून मानसिंगभाऊंच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे आणूया.
प्रारंभी इतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील, राजारामबापू कारखाना माजी संचालक जयसिंगबापू पाटील, बाजार समिती माजी संचालक संपतराव पाटील, बँकेचे माजी संचालक जगन्नाथ स्वामी, माजी प. स. सदस्य जयकर नांगरे, पाणी पुरवठा अध्यक्ष उत्तम पाटील, इंजिनिअर सेलच्या अध्यक्ष प्रणिती पाटील, संचालक राजेश पाटील, सरपंच निवृत्ती माळी, उपसरपंच युवराज पाटील, जयदीप पाटील, माजी सरपंच देवाप्पा धुमाळे, माजी सरपंच देवाप्पा धुमाळे, माजी उपसरपंच जयवंत नांगरे, राजेंद्र पाटील, डि. के. पाटील, जयदीप पाटील, विठ्ठल माळी आदी मान्यवर महाविकास आघाडी व मित्र पक्षांतील कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते.
-
Tags
शिराळा प्रतिनिधी