
नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमाचा माजी विद्यार्थी प्रथमेश भीमराव कुंभार याने प्रथम वर्षी बी. ए .एम .एस .या वैद्यकीय परीक्षेमध्ये 1700 पैकी 1313 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. त्याने मिळवलेल्या उज्ज्वल यशाबद्दल सूरज फौं डेशनचे संस्थापक श्री. प्रवीण लुंकड यांच्या हस्ते रोपटे देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी सेक्रेटरी श्री. एन.जी.कामत, संस्थेचे अॅडमिनीस्ट्रेशन ऑफिसर श्री. रघुनाथ सातपुते, मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री. अधिकराव पवार तसेच प्रथमेशचे वडील श्री. भीमराव कुंभार व स्पोर्ट्स इनचार्ज विनायक जोशी उपस्थित होते. श्री. लुंकड यांनी प्रथमेशने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे कौतुक केले तसेच त्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Tags
सांगली प्रतिनिधी