विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात दिपावली लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात संपन्न


चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात आज दिपावली लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व सौ. सुनीता नाईक यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर व फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. लक्ष्मीपूजनाचा विधी आटोपल्यानंतर सौ. नाईक व आमदार श्री. नाईक यांनी उपस्थित सर्व संचालक मंडळाला दिपावली, लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा दिल्या. संचालक सर्वश्री. दिनकरराव पाटील, विजयराव नलवडे, विष्णू पाटील, सुरेश पाटील, विश्वास कदम, सुरेश चव्हाण, यशवंत दळवी, बाबासो पाटील, तुकाराम पाटील, बाळासो पाटील, सुकुमार पाटील, आनंदा पाटील, संदीप तडाखे, बाळासाहेब पाटील, शिवाजी पाटील, यशवंत निकम, सुहास पाटील, संभाजी पाटील, कोंडिबा चौगुले, कामगार संचालक दत्तात्रय पाटील यांच्यासह कामगार संघटना अध्यक्ष विजय पाटील, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post