शिराळा विधानसभा मतदार संघाची चौफेर प्रगती साधणाऱ्या आमदार मानसिंगराव नाईक यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी,- रणधीर नाईक



शिराळा (प्रतिनिधी) : शिराळा विधानसभा मतदार संघाची चौफेर प्रगती साधणाऱ्या आमदार मानसिंगराव नाईक यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे प्रतिपादन यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक यांनी केले. 
कांदे (ता. शिराळा) येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख उपस्थित होते. 
यशवंतचे अध्यक्ष श्री. नाईक म्हणाले, विरोधकांचा मतदार संघाच्या विकासात योगदानच नाही. ते फक्त वाड वडिलांची पुण्याई सांगत आहेत. त्या पुण्याईवर बोलण्याचा अधिकार फक्त काँग्रेस पक्षाला आहे. शिराळा मतदार संघाच्या विकासाला खऱ्या अर्थाने माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व आमदार मानसिंगभाऊंनी दिली आहे. औद्योगिक संस्थांची उभारणी करत रोजगार निर्मिती झाली आहे. शेती व शेतकरी सक्षम केला आहे. प्रत्येक गावासाठी विकास निधी आणून आवश्यक कामे पूर्ण केली आहे. त्यांच्या विजयासाठी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी राज्यमंत्री नाईकसाहेब व हजारो कार्यकर्त्यांची खंबीर साथ आहे. 
आमदार नाईक म्हणाले, विरोधक विकासावर बोलण्याचे जाणीवपूर्वक टाळत आहे. त्यावर बोलण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही, याची जाणीव त्यांना आहे. भूलथापा मारून शिराळा, वाळव्यातील जनता फसणार नाही. त्यांना त्यांच्या गावाचा, परिसराचा विकास हवा आहे. तो पूर्ण करण्याचे बहुतांशी काम माझ्या हातून गेल्या पाच वर्षात झाले आहे. म्हणून मी तुमच्यापुढे पुन्हा निवडणुकीत आहे. तुतारी चिन्हासमोरील बटण दाबून पुन्हा तुमची सेवा करण्याची संधी तुम्ही द्याल, याची खात्री आहे. 
प्रारंभी विश्वासचे संचालक सुरेश चव्हाण यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी वारणा कारखाना संचालक विजय पाटील, उदगीर शुगरचे कार्यकारी संचालक उत्तम पाटील कांदे, सरपंच रोहित शिवजातक, उपसरपंच छन्नूसिंग पाटील, सोसायटी अध्यक्ष  भडकीमकर, उपाध्यक्ष अनिल पवार, गजानन पाटील, माधव मोहरेकर, अमोल पाटील, दिलीप शिवजातक. आनंदराव पाटील, सुधीर चव्हाण, राजेंद्र पाटील, धनाजी पाटील, भोलासो पाटील, संभाजी पाटील, संजय पाटील, दत्तात्रय पाटील, धनाजी पाटील, दिलीप पाटील, दत्तात्रय शिंदे यांच्यासह सर्व सोसायटी संचालक, इतर संस्थांचे पदाधिकारी कर्मचारी व कार्यकर्ते  उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post