रेठरे हरणाक्ष, सावळवाडी येथे पाणंद रस्त्यांच्या प्रत्यक्ष कामांना सुरुवात

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण : शेतकऱ्यांनी मानले निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांचे आभार

इस्लामपूर : प्रतिनिधी
भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या विशेष प्रयत्नातून मिळालेल्या रेठरे हरणाक्ष येथे १ कोटी ४४ लाख रुपये तर सावळवाडी येथे ३६ लाख रुपये निधीतून होणाऱ्या पाणंद रस्ता कामांना आज मंगळवारी प्रत्यक्ष प्रारंभ झाला.

महायुती सरकारच्या माध्यमातून निशिकांतदादांनी इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील पाणंद रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे. यामुळे आता अनेक वर्षे शेतकऱ्यांना खते, धाने, आदींची वाहतूक करताना होणारी तारेवरची कसरत थांबणार आहे. आज रेठरे हरणाक्ष येथे १ कोटी ४४ लाख रुपये तर सावळवाडी येथे ३६ लाख रुपये निधीतून होणाऱ्या पाणंद रस्ता कामांना प्रत्यक्ष प्रारंभ झाला. गेले अनेक वर्षे विद्यमान आमदारांकडून या रस्तासाठी नुसते नारळ फुटले. पण काम काही मार्गी लागले नाही. पण निशिकांतदादांनी नारळ फोडून प्रत्यक्ष काम सुरू केल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण होते. उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी निशिकांतदादांचे आभार मानले. तसेच आगामी काळात निशिकांतदादांसारख्या कर्तृत्ववान नेतृत्वाच्या मागे ठाम उभे राहण्याचा निर्धार केला.  

यावेळी रेठरे हरणाक्ष येथे महेंद्र पवार, माणिक जाधव, अक्षय मोरे, धनाजी कदम, माणिक जाधव तर सावळवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य विजय मसुटगे, माणिक आवटी, निखिल बोरगावे, बाळासो मसुटगे, रियाज मौशाळे, धनंजय पाटील, शरद भोसले, अभिजित कारवे, संजय एलोरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post