जत विधानसभा मतदारसंघ हवा राष्ट्रवादीलाविष्णू मानेंच्या उमेदवारीसाठी अजितदादांना साकडे

सांगली: महायुतीच्या जागा वाटपात सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा या मतदारसंघातून ओबीसी समाजाचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, मा. नगरसेवक विष्णू माने यांना संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली.
राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौैर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बिरेंद्र थोरात, सागर शिंनगारे यांच्यासह माजी नगरसेवक विष्णू माने यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. महायुतीच्या जागा वाटपामध्ये सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा त्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडे तुम्ही प्रयत्न करावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. या विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, मा. नगरसेवक विष्णू माने यांना संधी देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.
विष्णू माने हे गेली पंधरा वर्षे महापालिकेचे नगरसेवक होते. प्रभागत कोट्यावधी रूपयांची कामे केली आहेत. त्यांचे मूळ गाव वाशान तर आजोळ हे बाज आहे. ते जत तालुक्यातील भूमीपुत्र आहेत. शिवाय या मतदारसंघात ओबीसी समाजाचे दोन लाख मतदान आहे. सांगलीत ओबीसी मेळावा घेण्यात आला होता. याचे संयोजन विष्णू माने यांनी केले होते. शिवाय शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या उभारणीत देखील त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे ओबीसी समाजाकडून त्यांच्या उमेदवारी मागणी होत आहे. त्यांचा विचार करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post