डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक अनावरण आणि लोकार्पणसोहळ्यास उपस्थितीचे आवाहन

सांगली दि. २: राज्याचे जेष्ठ नेते, माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक अनावरण आणि लोकार्पण ५ सप्टेंबर रोजी काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांच्या हस्ते स. १० वाजता वांगीतील सोनहिरा साखर कारखाना स्थळी होणार आहे. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार, शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे, आजी- माजी मंत्री, खासदार व आमदार, राज्याचे नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी व नियोजन आमचे मार्गदर्शक माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सुरु असून या सोहळ्यास महाविकास आघाडी व सर्व घटक पक्षांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व अन्य घटकपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन करीत आहोत.
यावेळी बिपीन कदम, सनी धोतरे, डॉ. नामदेव कस्तुरे, आसिफ बावा, संतोष भोसले, रविंद्र वळवडे, महावीर पाटील, रामभाऊ पाटील, प्रा. एन. डी. बिरनाळे, सच्चिदानंद कदम, अजय देशमुख, प्रशांत देशमुख, आयुब निशाणदार व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post