प्रा.दत्तात्रय पाटील : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे बँक खाते त्वरित मिळणार काढून
इस्लामपूर : प्रतिनिधी
राज्य सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे बँक खाते त्वरित काढून देण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर येथे भाजपातर्फे ४ ते ६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत बँक खाते ओपनिंग भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती योजनेचे इस्लामपूर विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचे अध्यक्ष व भाजपाचे वाळवा तालुका उपाध्यक्ष प्रा.दत्तात्रय पाटील यांनी दिली.
प्रा.दत्तात्रय पाटील म्हणाले, केंद्र व राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजना म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, पी.एम.किसान योजना, वयोश्री योजना, उज्वला गॅस सबसिडी योजना, या सर्व योजनांचे पैसे आपल्या " फिनो पेमेंट बँक" यामध्ये जमा होत आहेत. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे. तसेच तो फॉर्म मंजूर होऊनही बँक खात्याशी आधार लिंक नसल्याने त्या महिलांचे पैसे जमा झालेले नाहीत. तसेच नवीन फॉर्म भरणाऱ्या महिलांनाही या योजनांचा लाभ सुलभरित्या घेता यावा. या उद्देशाने भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपातर्फे ४ ते ६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत इस्लामपूर येथील तहसील कार्यालयशेजारी, नाट्यगृहाजवळ असण्याऱ्या प्रकाश महा ई सेवा केंद्रात बँक खाते ओपनिंग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात महिलांना त्वरित आधार लिंक व डीबीटी लिंक करून बँक खाते "फिनो पेमेंट बँक" मधून काढून देण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनांचे पैसे महिलांच्या खात्यात त्वरित जमा होण्यास मदत होईल. नवीन खाते काढण्यासाठी महिलांनी स्वतः उपस्थित राहून आधारकार्ड, पॅनकार्ड (नसले तरी चालेल), फोटो घेऊन यायचे आहे. तरी महिलांनी या मोफत मेळाव्याचा लाभ घ्यावा.
Tags
इस्लामपूर प्रतिनिधी