शंभर फुटी रोडवरील बंद पोलीस चौकी तातडीने सुरू करावी मदन भाऊ पाटील युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे




सांगली प्रतिनिधी


सांगली शहरातील १०० फुटी रोड वरील बंद असलेली पोलिस चौकी तातडीने सुरू यावी या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली यांना मदनभाऊ पाटील  युवा मंच जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांनी दिले,

 १०० फुटी रोड पाकीजा मशिद सांगली येथे पोलिस चौकी चालू करण्यात आली होती. त्यावेळेस या परिसरामध्ये गांजा व नशेच्या गोळा खाऊन नशा करून इंदिरानगर झोपडपटटी, १०० फुटी रोड या परिसरातील नशेखोर तरूण नागरिकांना त्रास देत होते. या पोलिस चौकी मुळे तो त्रास बंद झाला होता. परंतू गेल्या अनेक महिन्यापासून सदरची पोलिस चौकी ही पूर्णपणे बंद केली असलेने पुन्हा या परिसरात तसेच दिगंवर मेडीकल चौक येथे गांजा व नशेच्या गोळया खाऊन तेथील व्यवसायिकांना दमदाटी करून वस्तू घेणे, कामावरून ये जा करणा-या कामगारांना रात्रीच्या वेळी अडवणे व त्यांना दमदाटी करून पैसे काढून घेणे तसेच १०० फुटी वरील थांबलेल्या गाड्यांवर

दगड मारणे अशा अनेक घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे या परिसरातील व्यवसायिक व नागरिकांच्या मध्ये प्रचंड भितीचे वातावरण आहे. तरी या भागातील बंद असलेली पोलिस चौकी तातडीने सुरू करून कायमस्वरूपी दोन  पोलिस कर्मचा-यांची नेमणूक करून या भागातील नागरिकांना सरंक्षण मिळवून द्यावे अशी मागणी मदनभाऊ पाटील युवा मंच जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांनी केली आहे,

Post a Comment

Previous Post Next Post