सांगली, दि.२१: येथील प्रभाग क्रमांक ९ मध्ये रजपूत मळा येथे अंतर्गत गटार कामाचा कार्यारंभ आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते झाला. या कामासाठी आमदार गाडगीळ यांनी ३० लाख ३३ हजार १११ रुपये निधी शासनातर्फे मंजूर करून आणला आहे.
या अंतर्गत गटारीमुळे परिसरातील सांडपाण्याची व्यवस्थित विल्हेवाट होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हे महत्त्वपूर्ण काम होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या कामाचा आरंभ झाल्याबद्दल आमदार गाडगीळ यांचा नागरिकांनी उस्फुर्त सत्कार केला.
या प्रसंगी परिसरातील नागरिक या संख्येने उपस्थित होते.
......
Tags
सांगली प्रतिनिधी