दि.२९/०९/२०२५ रोजी फिर्यादी भिमराव पाटील, वय ७४ वर्षे हे सकाळी रोडकडेने चालत जात असताना दोन अनोळखी इसमांनी मोटार सायकलवरून येवून बोलण्याच्या बहाण्याने जवळ येवून फिर्यादीचे गळ्यातील सोन्याचा गोप हिसडा मारून जबरी चोरी करून पळून गेले होते. सदर घटनेबाबत
आष्टा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक,कल्पना बारवकर यांनीस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन जबरी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशित केले होते.
त्या अनुशंगाने सहा पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर यांचे पथकामधील पोहेका / संदीप गुरव आणि पोका / सुरज थोरातयांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की,सांगलीवाडी टोलनाका जवळतीन इसम चोरीचे दागिने स्प्लेण्डर मोटार सायकलवरून विक्री करणेकरीता येणार आहेत.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे सांगलीवाडी टोलनाका परिसरात जावून सापळा लावून थांबले असता तिन इसम मोटर सायकल वरून येवून संशयितरित्या थांबलेले दिसले. त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहा पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यांनात्यांची नावे गावे विचारता त्यांनी त्यांची नावे १) प्रेम दिपक कांबळे, वय २१ वर्षे, रा. मु. पो.मातंग समाज, खोची फाटा, सावर्डे, ता.हातकणंगले, जि. कोल्हापुर,२) तुषार शहाजी कांबळे,वय १९ वर्षे, रा. मु. पो.मातंग समाज, खोची फाटा, सावर्डे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर.३) आकाश प्रकाश टिबे, वय २२ वर्षे, रा. मु. पो. नाईकबा मंगल कार्यालयजवळ, गोटखिंडी, ता. वाळवा, जि. सांगली अशी असल्याची सांगितले.
सहा पोलीस निरीक्षक जयदिप कळेकरयांनी त्यांना मिळाले बातमीची थोडक्यात हकीकत सांगुन अंगझडतीचा उद्देश कळवुन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता,प्रेम दिपक कांबळे याचे पॅन्टचे उजव्या खिशात सोन्याचा गोप मिळून आला. सदर सोन्याच्या गोपबाबत त्याचेकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा पोलीस निरीक्षक जयदिप कळेकरयांनी प्रेम कांबळेयास अधिक विश्वासात घेवून त्याचे कडे मिळालेल्या सोन्याच्या गोपबाबत विचारणा केली असता, त्याने सदरचा गोप हा तो व तुषार कांबळे यांनी आकाश प्रकाश टिबे याचे मदतीने सदर मोटार सायकलवरुन वाळवा तालुक्यातील गोटखिंडी ते मालेवाडी रोडवरून सकाळी फिरायला आलेल्या वयोवृध्द इसमाचे गळ्यातील सोन्याचा गोप हिसडा मारून चोरी केला होता तो हाच असलेबाबत कबुली दिली.
सदर बाबत आष्टापोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्याचे कब्जातील सोन्याचा गोप, गुन्हयात वापरलेली मोटार सायकल पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर यांनी पंचासमक्ष जप्त केले आहेत. सदरचे तीनही आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी आष्टा पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास आष्टा पोलीस ठाणे करीत आहेत.