नितीन ( काका ) शिंदे वाढदिवस विशेष

 


4 डिसेंबर आज नितीन काकांचा वाढदिवस सांगली मध्ये नितीन काका शिंदे हे नाव परिचयाचं नाही असा एखादा ही माणूस तुम्हाला भेटणार नाही . सर्वांशी मिळून मिसळून राहण्याचा आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे असा नितीन काकांचा स्वभाव. सलग दहा वर्ष नितीन काकांच्या पत्नी आशाताई शिंदे नगरसेवीका होत्या त्या काळात मोठ्या प्रमाणात समाज उपयोगी कामे नितीन काका व आशाताई यांच्या माध्यमातून झाली. वार्ड 14 मध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यात त्यांनी हातभार लावलेला आहे .  वार्ड क्रमांक 12 आणि  14 मध्ये आशाताई शिंदे व नितीन काका शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. 


नितीन काकांनी वेगवेगळ्या सामाजिक संस्थेचे अनेक पदभार सांभाळलेला आहे  त्यामध्ये  महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सदस्य , सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह ,  सांगली जिल्हा रस्सीखेच असोसिएशनचे अध्यक्ष , सांगली शरीर सौष्ठव संघटनेचे उपाध्यक्ष , न्यू उत्कर्षे मंडळ सांगलीचे संस्थापक अध्यक्ष , सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त , कर निर्धारक व संकलक ,मालमत्ता व्यवस्थापक , सांगली मिरज आणि कुपवाड सिटी कार्पोरेशन सॅलरी अर्नर्स  को - ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे माजी चेअरमन , सांगली जिल्ह्यातील अनेक क्रीडा , सामाजिक व सांस्कृतिक संघटना- मंडळांचे पदाधिकारी अशा विविध संघटनांचे प्रतिनिधित्व त्यांनी केलेले आहे . सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन एक वेगळ्याच उंचीवर नेहन्यामध्ये  नितीन काकांचा खारीचा वाटा आहे नितीन काकांना वाढदिवसाच्या व पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.




 सांगली जिल्ह्यातील अनेक क्रीडा , सामाजिक व सांस्कृतिक संघटना- मंडळांचे पदाधिकारी , सांगली जिल्हा परिषदेचा पदमभूषण डॉ. वसंतराव दादा पाटील जिल्हा क्रीडा संघटक पुरस्कार , युवा सेना सांगलीचा क्रीडा संघटक पुरस्कार तसेच दैनिक सकाळ वृत्तपत्र समुहाचा राज्यस्तरीय सकाळ  IDOLS MAHARASTRA WORKING PROFESSIONALS CHAIRMAN  पुरस्कारासह अनेक पुरस्कारांचे मानकरी ,  जिल्हा व राज्यस्तरीय अनेक कबड्डी स्पर्धा , जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा व राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेचे मुख्य आयोजक , सांगली जिल्ह्याचे धडाडीचे क्रीडा संघटक ,  कबड्डीपट्टू  मा.श्री. नितीन काका शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!




                                                          गजानन काळेबेरे - अध्यक्ष गजेंद्र कला क्रीडा मंडळ


Post a Comment

Previous Post Next Post