माझे राजकीय गुरु, शिक्षण महर्षी,लोकनेते राज्याचे ज्येष्ठ नेते सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, कडेगाव पलूस मतदार संघाचे भाग्यविधाता, सांगली जिल्ह्याचे अनेक वर्षे राहिलेले पालकमंत्री,ताकारी,टेंभूचे शिल्पकार,राज्याचे शिक्षण, पाटबंधारे,महसूल,उद्योग,वने, जलसंधारण,संसदीय कार्य,मदत,पुनर्वसन विभागाचे अनेक वर्ष राहिलेले मंत्री,भारती विद्यापीठाचे संस्थापक व कुलपती आदरणीय स्व,मा,डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचे अनावरण कार्यक्रम कडेगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे विरोधी पक्ष नेते माननीय खासदार राहुलजी गांधी यांच्या शुभ हस्ते गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता भारती विद्यापीठ,मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय, कडेगाव,तालुका, कडेगाव,जिल्हा सांगली या ठिकाणी होणार आहे, या वेळेला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.मा.शरदचंद्रजी पवार साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार मा.मल्लिकार्जुन खरगे साहेब असणार आहेत,यावेळी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस खा.मा.वेणूगोपाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री मा. रेवंथ रेड्डी,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी मा.आ.रमेश चेनीथला,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.मा नानाभाऊ पटोले साहेब, विरोधी पक्षनेते मा.आ. विजय वडेट्टीवार, विधिमंडळ गटनेते मा. बाळासाहेब थोरात.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.खा.मुकुल वासनिक,माजी मुख्यमंत्री मा. सुशील कुमार शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मा.आ.जयंत पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे व महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी सांगली जिल्ह्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील स्वर्गीय आदरणीय डॉ.पतंगरावजी कदम साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी या वेळेला उपस्थित राहावे असे नम्र आव्हान मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये केले.
Tags
सांगली प्रतिनिधी